शेतात पाठलाग करून जाळ्यात अडकवले
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत तस्करांच्या टोळीकडून ताब्यात घेण्यात आलेले खवले मांजर संगमेश्वर कसबा येथे पकडण्यात आले होत़े अनेक दिवसांपासून या मांजरावर तस्करांकडून पाळत ठेवण्यात आली होत़ी शेतामध्ये पाठलाग करून हे मांजर जाळ्यामध्ये अकडकविण्यात आले होते अशी माहिती पोलिस तपासामध्ये समोर आली आह़े
बुधवारी सायंकाळी कारवांचीवाडी येथे शहर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत खवले मांजर व मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी मुद्देमालासह पकडण्यात आली होत़ी आठ संशयित आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होत़े
खवले मांजराचा मुख्य आहार किडे-मुंग्या असल्याने अशा ठिकाणाचा शोध संशयित आरोपिंकडून घेण्यात आला होत़ा संगमेश्वर कसबा येथे शेतामध्ये हे मांजर असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी जाळ्यामध्ये या मांजाराला पकडले होत़े मात्र पकडलेले खवले मांजर 7 दिवस उपाशी राहिले होत़े त्यामुळे लवकरात लवकर विक्री करण्यावर या संशयित आरोपोचा कल होत़ा त्यासाठी त्यांनी बोलणी करण्यास सुरूवात केल़ी मात्र याची कुणकुण पोलिसांना लागल्याने तस्करांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांकडून व्यूहरचना करण्यात आल़ी त्यानुसार शहरालगतच्या काजरघाटी येथून संशयित आरापींना ताब्यात घेण्यात आले होत़े









