वार्ताहर/ संगमेश्वर
तालुक्यात सलग 2 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडनदीला पूर आला आहे. तर शास्त्राr, बावनदी आणि सोनवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी कधीही बाजारपेठांतून घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सलग 2 दिवस मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील गडनदीला पूर आला असून माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तर बावनदी व शास्त्राr नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 2 दिवस पडणाऱया पावसाने रविवारी दुपारनंतर पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे बावनदीचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. सखल भागातील शेती पुराच्या पाण्याखालीच असून सखल भागातील रस्ते पुराच्या तसेच पावसाच्या पाण्यामुळे गटारातून येणाऱया पाण्यामुळे जलमय झाले आहेत. संगमेश्वर आठवडा बाजारपेठेतील रस्ता कधीही पुराच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता असून पुन्हा बाजारपेठेतील घरे, दुकाने पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे महसूल विभागाने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. साडवलीत गटारातून येणाऱया पाण्यामुळे रस्ता पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे कोळंबे, नांदळजमार्गे कोसुंब रस्त्यावर जुनाट झाडे कोसळली होती. मात्र ग्रामस्थांनी ती दूर केली.









