प्रतिनिधी / संकेश्वर :
येथील नमाजमाळातील प्राथमिक मराठी शाळेत विज्ञानोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये संकेश्वरातील सर्व सरकारी मराठी शाळांनी सहभाग दर्शविला होता. हा कार्यक्रम एसीसीएफ व मराठी उच्च प्राथमिक शाळा नमाजमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष धनाजी माने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्रसमन्वयाधिकारी एस. डी. नाईक, व्ही. एम. मास्तमर्डी, संकेश्वर सीटीजन फोरमचे सचिव मुरली बडिगेर, संतोष डांबरे, मयूर जाधव, राकेश डोंगरे, विशाल माने, अमित देशपांडे उपस्थित होते.
यावेळी नाईक यांनी, मुलांच्या सृजनशिलतेला आणि वैज्ञानिकतेला वाव मिळण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज असते. मराठी शाळेच्या शिक्षकांमध्ये हे कौशल्य दिसून येते, असे त्यांनी सांगितले. साधना कॉलेजचे प्रा. पुंडलिक परीट यांनी, मुलांना अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक जागृतीविषयी माहिती दिली. या विज्ञान वस्तू प्रदर्शनामध्ये 50 हून अधिक प्रयोगांचा समावेश होता. यावेळी परिक्षक म्हणून शशिकांत कडगावी, पी. एफ. कुंडेकर, सुजाता कटांबळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन मेघा देसाई, प्रास्ताविक मुख्याध्यापिका के. एम. हिरेकोडी, स्वागत एस. के. पोवार तर शिला गिरडी यांनी आभार मानले.









