प्रतिनिधी / संकेश्वर
संकेश्वरातील सुन्नत जमात तंजिम कमिटीच्यावतीने आतापर्यंत कोरोना काळात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यांनी कोरोनाने निधन झालेल्या 15 जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांनी सध्या पुणे-बेंगळूर महामार्गावरील ट्रक व अवजड वाहनांवरील चालक-क्लिनर यांना पुलाव व पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यावेळी मुन्ना सोलापुरे, बबलू मकानदार, ताजुद्दीन मालदार, अलताप किल्लेदार, इस्माईल किल्लेदार, अफझल गोकाके, बशीर देसाई, तबरेज हजरतभाई, अलताप सायण्णावर, फिरोज मालदार, अस्लम लंदूर, मन्सूर मालदार, इम्तियाज देसाई, महेश सुतार, राहुल कांबळे, सैफुद्दीन कर्नाची, अबुसाकीब देसाई, आनंद मुरगुंडे, अबूसलमान संगोळ्ळी, सिराज नाईकवाडी हे परिश्रम घेत आहेत.









