बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक हायकोर्टाने मंगळवारी सँडलवूड ड्रग्स प्रकरणी कन्नड चित्रपट अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि संजना गलराणी यांचे जामीन अर्ज फेटाळले. या दोघांना सप्टेंबरमध्ये बेंगळूर केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.
हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्रीनिवास हरीश कुमार यांनी आणखी एक आरोपी प्रशांतचा जामीन अर्जासह याचिका फेटाळून लावल्या तर याच प्रकरणातील आरोपी असलेले शिवप्रकाश, अभिषेक आणि प्रशांत राजू यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
कर्नाटक हायकोर्टाने आज अभिनेत्री रागिनी, संजना, प्रशांत रंका आणि शिवप्रकाश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, असे गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले.