बेंगळूर/ प्रतिनिधी
कन्नड चित्रपट अभिनेता रॉकलाइन सुधाकर यांचे गुरुवारी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ह्रदयाच्या झटक्यामुळे निधन झाले.
सुधाकर हा विनोदी कलाकार म्हणून आणि कन्नड चित्रपट सृष्टीतील सह अभिनेता म्हणून ओळखला जातो. वृत्तानुसार, सुधाकर नुकतेच कोरोनातून बरे झाले होते.
पुष्कर मल्लिकार्जुनय्या निर्मित ‘शुगरलेस’ चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण बेंगळूरमधील बन्नेरघट्टा येथे सुरू होते.चित्रीकरणादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
१९९२ मध्ये सुधाकर यांनी चित्रपटात पदार्पण केली. त्यांनी पंचरंगी, परमात्मा, नाटक, श्री आणि श्रीमती रामचारी, लव्ह इन मंड्या ’आणि‘ वास्तु प्रकार ’यासह कन्नडमधील २०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.









