प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण विभाग व श्रेष्ठा फौंडेशन संघाच्यावतीने डॉ. रुपाली शिंदे व गौरी गजबर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू कुष्ठ रोग्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे आजारांनी त्रस्त असलेल्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा कठीण काळात कुष्ठ रोग्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी चांदणी देवडी, जिल्हा कुष्ठ रोग नियंत्रण अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिवाय फौंडेशनतर्फे शहरातील गरजू कुष्ठ रोग्यांना जीवनावश्यक साम्रगीच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात रुग्णांनादेखील मदत होत आहे.









