प्रतिनिधी /मडगाव
रेडी गावची ग्रामदैवत व कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री देवी माऊली रेडीचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यादिवशी सकाळी 6 वाजता श्री देवी व परिवार देवतांची पुजा होईल.
सकाळी 8 वाजता उत्सव मूर्तीची सजावट व त्यानंतर ओटी भरणे व नवस फेडणे कार्यक्रमाला सुरूवात होईल. 11 वाजता मंदिराच्या सभामंडपात देवीच्या साडय़ांचा लिलाव, रात्री 11 वाजता संबंधितांना तेल वाटप व पुराण वाचन, 11.45 वाजता देवी समोरील कुवाळा ज्योतीचा विधी तर रात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देवीची पालखी प्रदक्षिणा होणार असून त्यानंतर वालावलकर दशावतार मंडळाचा नाटय़प्रयोग होणार आहे. गोव्यातील विविध भागात असलेल्या सर्व भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा.









