प्रतिनिधी / म्हार्दोळ
भोम, फोंडा-गोवा येथील महानंदू ग. नाईक मेमोरीयल हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक श्री. दामोदर फडते यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ सोहळा दि. 26 डिसेंबर 2020 रोजी वेलिंग प्रियोळ कुंकळय़े ग्रामपंचायतीच्या सभागृहात म्हार्दोळ येथे संध्याकाळी 6 वा. आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक, गोवा मान. श्री. डि.आर. भगत व विशेष अतिथी म्हणून मानव संसाधन विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. नारायण नावती हे उपस्थित राहणार आहे.
तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थती राहून शोभा आणावी असे आयोजक मंडळातर्फे कळवीण्यात आले आहे.









