प्रतिनिधी / शिरोळ
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पर्यावरण विभागातील राजेश यशवंत ठोमके वय वर्ष 40 उदगाव, गोपाळ सिद्राम जंगम वय वर्षे 43 रा औरवाड, व संदीप रमेश कांबळे वय वर्षे 38 रा कुटवाड हे तीन कर्मचारी कारखान्याच्या कार्यस्थळावरील ई टी पी प्लांटमधील टाकीत उतरून पाईप लाईन मधील लिकेज काढण्यासाठी गेले होते गॅस तयार झाल्यामुळे या तीघाचाही श्र्वास गुदमरून बेशुद्ध पडले चौथ्या कामगार राजु रजपुत हा या तीन कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होता त्यांच्याही श्वास गुदमरू लागला उपस्थित कर्मचार्यांनी तातडीने त्यास कारखान्याच्या कार्यस्थळावरील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले.
या प्लॅन्टमधे कर्मचारी बेशुद्ध पडले पडल्याची माहिती समजताच जेसीबीच्या सहाय्याने भिंत पाडून बेशुद्ध कर्मचार्ना बाहेर काढण्यात आले त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्या तिघांची प्राणज्योत मावळली होती.
दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेली घटना दुर्दैवी असून मूर्त कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकातील एकास नोकरी दिली जाणार आहे तसेच कारखान्याच्या नियमानुसार त्याचा लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले शिरोळ पोलिस ठाण्यात सदर घटनेची वर्दी शक्तीजीत गुरव यांनी पोलिसात दिली आहे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कामगारांच्यामृत्यूची बातमी वारयासारखी पसरली उदगाव औरवाड कुटवाड येथील त्यांच्या नातेवाइकांना व कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी एकच गर्दी कारखाना स्थळ केली होती नातेवाईकांनी केलेला हंबरडा काळजी पिळून टाकणारा होता.
या घटनेची माहिती समजताच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक महेंद्र बागे दरगु गावडे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील इंद्रजीत पाटील अशोक कोळेकर धनाजी पाटील नरदेकर कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप बनगे धोंडीराम दबडे यांच्यासह अन्य संचालक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









