क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती श्री सार्वजनिक श्रीगणपती उत्सव मंडळ, झेंडाचौक व जिल्हा शरीरसौष्टव संघटना व संजय सुंठकर स्पोर्ट्स फौंडेशन, दर्शन डिझाईनर यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व्या गणेश श्री जिल्हास्तरीय शरीरसौ÷व स्पर्धेचे आयोजन 12 मार्च रोजी रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80 व 80 वरील वजनी गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पाच विजेत्या स्पर्धकाला अनुक्रमे 2500, 2000, 1500 व शेवटच्या दोन स्पर्धकांना प्रत्येकी 1000 रूपये, प्रमाणपत्र, चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. श्री गणेश किताब विजेत्याला शंकरराव मोरे यांच्या स्मरणार्थ राजु मोरे यांच्याकडून मानाचा किताब, आकर्षक चषक व 5000 रूपये रोख देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट पोझरलाही मानाचा किताब व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी अजित सिद्दण्णावर, सुनिल राऊत, गिरीष पाटणकर, अमित किल्लेकर, भुपेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधावा. 12 मार्च रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत स्पर्धकांचे वजन घेण्यात येणार असून, 4.30 वा. स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, असे कळविण्यात आले आहे.









