ऑनलाईन प्रतिनिधी / कोलंबो
गेल्या वर्षी जाफनाजवळील तीन बेटांवर श्रीलंका सरकारने मंजूर केलेल्या चिनी प्रकल्पाच्या जागी भारत हायब्रीड ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.
सोमवारी परराष्ट्र मंत्री (EAM) एस. जयशंकर यांनी श्रीलंकेला भेट दिली. या भेटीत त्यांनी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री जीएल पेरिस यांच्याशी फलदायी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये श्रीलंकेची आर्थिक पुनर्प्राप्ती आणि मच्छिमारांच्या समस्यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत जाफनाजवळील तीन बेटांवर प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.