नवी दिल्ली : पुढील महिन्यातील श्रीलंका दौऱयासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे सोपवले गेले आहे. राष्ट्रीय निवड समितीने गुरुवारी रात्री उशिरा ही घोषणा केली. भारतीय संघ लंकेत दि. 13 ते 25 जुलै या कालावधीत 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळणार आहे. देवदत्त पडिक्कल, चेतन साकरिया, ऋतुराज गायकवाड यांना या संघात संधी मिळाली आहे.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.









