ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंका सरकारने संसदेत गोहत्या बंदी विधेयकास मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाचे प्रवक्ते केहेलिया राम्बुकवेला यांनी ही माहिती दिली.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पोदुजाना पेरामुना या सत्ताधारी पक्षाच्या संसदीय समितीने हा प्रस्ताव मंजूर केला होता. संसदेत या विधेयकास मान्यता मिळाल्याने लवकरच हा कायदा लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. श्रीलंकेत यापुढे म्हैस, गाय, बैल यांच्या कत्तलीवर बंदी असणार आहे.मात्र, देशात गोमांस खाणाऱ्यांसाठी ते आयात करून स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
श्रीलंकेत गुरांच्या कत्तलीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पशुधनाचे स्रोत कमी होणे, शेतीसाठी गुरांची कमतरता निर्माण होणे आणि दुग्धव्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे सर्वच पक्षांनी गोहत्या बंदीचा मुद्दा मांडला होता.