वार्ताहर / सांबरा
हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथे सोमवारी दुपारी झाडावरून पडून जखमी झालेल्या वानराला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. दुपारच्या सुमारास वानर झाडावरून पडून जखमी झाल्याचे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आले. त्यानंतर लागलीच त्यांनी कलखांब येथील डॉक्टर मदन बिर्जे यांना पाचारण करून जखमी वानरावर उपचार केले. उपचारानंतर वानराला वनअधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने वानरावर उपचार करून घेतल्याने त्याला जीवदान मिळाले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









