प्रतिनिधी / बेळगाव
श्री भगवद्गीता ही नुसती न वाचता आचरणातही आणली पाहिजे. कोरोनाच्या या काळात तुमच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. याचा मला आनंद आहे, असे मार्गदर्शन स्वामीनी प्रज्ञानंदा दीदीनी केले. येथील किशोर, संजय, नितीन, राजेश या चार बंधूंनी स्थापन केलेल्या ‘काकडे फौंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आणि बालदिनाचे औचित्य म्हणून अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश माध्यम स्कूलमधील 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गंगुताई गाडगीळ स्मृती प्रित्यर्थ व्हर्च्युअल वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस समारंभात त्या बोलत होत्या.
कोवीड – 19 मुळे शाळेला मिळालेली दीर्घ सुट्टी आणि माझे अनुभव व अपेक्षा या विषयावर मराठी, कन्नड, हिंदी, संस्कृत या भारतीय भाषेतून घरबसल्या आपल्या मोबाईलवरच तीन मिनीटे भाषण रेकॉर्ड करून पाठविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेत प्रभावी विचार मांडले आणि डिजिटल इंडिया हा विचार अवलंबला. प्रथम, द्वितीय, तृतीय अशी आणि भाग घेणाऱया सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणूनही प्रमाणपत्रासह रोख बक्षिसे देण्यात आली.
शनिवार दि. 21 रोजी संत मीरा शाळेच्या माधवगृह सभागृहात हा कार्यक्रम पालक-शिक्षक, बुक लव्हर्स क्लब सदस्य व इतरांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित चिन्मय मिशन आश्रमच्या स्वामीनी प्रज्ञानंदा दीदी यांच्या शुभहस्ते विजेत्यांना बक्षिसे परीक्षकांसह या उपक्रमासाठी मदत करणाऱयांना भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. काकडे फौंडेशनतर्फे शाळेलाही छोटीशी देणगी देण्यात आली. प्रथम क्रमांक विजेत्यांनी आपली भाषणे पुन्हा सादर करून टाळय़ा मिळविल्या. परीक्षक म्हणून स्नेहा काकडे,
ऍड. अपूर्वा मराठे, स्नेहा मराठे, संस्कृत टीचर सविता जोशी यांनी तसेच कार्यक्रमात उज्ज्वला काकडे, अतुल पाटील, चंद्रशेखर गायकवाड, कुमार राघवेंद्र काकडेंनी मदत केली.
व्यासपीठावर चेअरमन परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार उपस्थित होते. सूत्रसंचालन टीचर रुपाली जोशीनी केले. त्यांना टीचर कांचन तुक्कार यांनी सहयोग दिला. तर आभार सुनीता मराठे यांनी मानले. प्रारंभी प्रार्थना, दीपप्रज्वलन, भारतमाता पूजन, पं. नेहरू प्रतिमा पूजन आणि श्रीमती गंगुताई गाडगीळ यांच्या प्रतिमेंचे पूजन करण्यात आले. बेळगावचे सुपुत्र माजी अतिरिक्त मुख्य सचिव कर्नाटकचे विजय गोरे आएएस यांच्या त्या मातोश्री होत. किशोर काकडेंनी स्पर्धेपाठीमागची भूमिका मांडून ‘मेक ईन बेळगाव-स्टे ईन बेळगाव ऍण्ड डेव्हलप बेळगाव’ हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. परमेश्वर हेगडेनी स्पर्धा इंग्रजीविरहीत केवळ भारतीय भाषांत घेऊन नव्या शिक्षणनितीची सुरुवात केल्याबद्दल कौतुक केले. मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदारनी स्वागत करून स्पर्धा घेतल्याबद्दल काकडे बंधू आणि गोरे परिवारचे आभार मानले. लॉकडाऊन नियम पाळत शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे मराठी-नेहा व्ही. माकणे, मेघा धामणेकर, श्रेया मेलगे, कन्नन-शिवप्रसाद बी. गौडा, आकाश ए. गुंजीकर, हिंदी-धृव डी. धाना, निधी डी. कदम, लक्षीता के. जांगिडे, निशा एस. रेवणकर, पृथ्वीराज शिंदे, संस्कृत-संचिता डी. निलजकर, पद्मश्री एस. बैलूर, वैष्णवी वाळवेकर, धनश्री एस. बैलूर उपस्थित होते.









