औरंगाबाद / ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणावरुन राज्यात अनेक राजकिय घडामोडींना वेग आला आहे. या मुद्यावरुन राजकिय नेते आरोप प्रत्यारोप ही करत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाने सद्य स्थितीत अमान्य केला असला तरी मराठा समाजाचे वास्तव न्यायालयात पून्हा अधिक समर्पकरित्या मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नव्याने हा लढा लढण्यासाठी राज्यभर दौरे सुरु केले आहेत.
या लढ्याचं रणशिंग कोल्हापुरातून फुंकले आहे. यासाठी खासदार संभाजी राजे राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरा करत आहेत. बुधवारी औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण देऊ नका. पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत मिळालीच पाहिजे, अशी भूमीका त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी बोलताना संभाजी राजे यांनी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला ‘सत्ताधारी’ ठरवलं म्हणून आम्ही गप्प बसू शकत नाही. आम्हाला कायद्याशी देणघेणं नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी लागू केलेली समाजरचना आजच्या महाराष्ट्राला लागू झालीच पाहिजे. बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे, सर्वप्रथम राज्यकर्ते मराठा समाजासाठी कोणत्या गोष्टी करायला तयार आहेत, हे त्यांनी सांगावे अशी ही भूमिका त्यांनी यावेळी घेतली. तसेच अजून काही व्यक्तींशी चर्चा करत अंतीम भूमिका 28 मे रोजी स्पष्ट करणार असल्याच ही त्यांनी स्पष्ट केलं.
खासदार संभाजी राजे छत्रपती यांचा व्हिडीओ येथे क्लिक करत पहा सविस्तर









