वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे एका बाजूला संपूर्ण जगासोबत देश लॉकडाऊनमुळे बंद असताना दुसऱया बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या आधारे जगाधील प्रमुख गुंतवणूकदारांच्या मदतीने रिलायन्सला 58 व्या दिवशी कर्जमुक्त करत आपल्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातूनच मुकेश अंबानी श्रीमंताच्या यादीत पहिले आशियातील श्रीमंत आणि जगातील पाचवे श्रीमंत म्हणून नोंद करण्यात आली आहे.
जगातील पाचव्या नंबरचे व्यावसायिक म्हणून मुकेश अंबानी यांची नोंद फोर्ब्सच्या यादीत नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये अंबानी यांनी 5.57 लाख कोटीच्या मदतीने अमेरिकेच्या वॉरन बफे यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.
रिलायन्स उद्योगाचे समभाग मागील चार महिन्यांच्या कालावधीपासून जोरदार उसळी घेत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. कंपनीचे समभाग सदर कालावधीत 135 टक्क्मयांनी वधारले आहेत. चालू आठवडय़ातील बुधवारी हेच समभाग 2,000 रुपयाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने बाजारमूल्यातही कंपनीने विक्रम नेंदवला आहे. मार्चमहिन्यात ही स्थिती 863 रुपये समभागावर गेली होती. त्यानंतर जिओ प्लॅटफार्ममधील गुंतवणुकीने रिलायन्सला वेगळी उंची प्राप्त करुन दिली आहे.
फोर्ब्सच्या यादीतनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 75 अब्ज डॉलवर गेली आहे. अंबानी रिलायन्स जिओमध्ये आतापर्यंत 14 कंपन्यांनी 1.52 लाख कोटीची गुंतवणूक केली आहे. यामुळे रिलायन्सने हे यश प्राप्त केल्याची नोंद करण्यात आली आहे.









