न्यूयॉर्क :
टेस्ला या प्रसिद्ध कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती होण्याचा मान नुकताच पटकावला आहे. त्यांनी जागतिक श्रीमंतांच्या यादीत अग्रेसर असणाऱया ऍमेझॉनचे सीईओ जेफ बोजेस यांना मागे टाकले आहे. मस्क यांची संपत्ती बोजेसपेक्षा 1.5 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. 49 वर्षीय स्पेसेक्सचे मुख्य एलॉन मस्क यांनी जगातील श्रीमंतांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर शेअर बाजारात त्यांच्या समभागांनी 5 टक्क्यापर्यंत उसळी घेतली होती. मस्क यांची एकूण संपत्ती 188 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. जेफ बोजेस हे आपले अव्वल स्थान 2017 पासून कायम राखून होते. कोरोना काळात अनेक दिग्गजांच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून आले आहे. मस्क यांचे नशीब 2020 मध्ये बदलण्यास सुरूवात झाली. त्यांच्या मिळकतीत या दरम्यान वाढ दिसून आली. गेल्या 12 महिन्यात 150 अब्ज डॉलर्सनी मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.