ऑनलाईन टीम / श्रीनगर
जम्मू – काश्मीर येथील श्रीनगर येथे सिंह रोडवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सैन्य दलाला निशाणा बनवले होते.मात्र यात सामान्य नागरीक जखमी झाले आहेत. सैन्य दलाकडून या ठिकाणी शोध मोहिम सुरु आहे.
हा हल्ला आज दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून ४० मिनिटांनी हरी सिंह हाय स्ट्रीट परिसरात घडवण्यावत आला असून यात भारतीय सैन्याला निशाणा बनवत ग्रेनेडचा वापर केला गेला आहे. परंतू ग्रेनेड फेकल्यानंतर ते जवानांच्या दिशेने फेकले होते. मात्र ते फेकण्यात चूक झाल्याने रस्त्याकडेला फुटले या मुळे सैन्य दलातील जवान जखमी झाले नसले तरी यात सामान्य नागरिक जखमी झाले आहेत. अशी माहिती किशोर प्रसाद, डीआयजी सीआरपीएफ, श्रीनगर यांनी दिली आहे. जखमी नागरिकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा शोधण्यासाठी सैन्य दलाने गती घेतल्याने परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.