ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी दातार डीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांची या उच्च पदावर नियुक्ती झाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करत एक पत्र शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, जगातील हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या डीन पदी श्री श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली आहे ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. 1908 साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी एक आहे. आज मराठी असंख्या तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार…
दरम्यान, हार्वर्ड बिझनेस स्कूलचे 11 वे डीन असणार आहेत. दातार यांनी मुंबई विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. चार्टर अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी आय आय एम अहमदाबाद मधून पोस्ट ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा केला आहे. तर सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात स्टॅन्डफोर्ड विद्यापीठातून पीएचडी केली आहे.