प्रतिनिधी / वडूज :
कातरखटाव (ता. खटाव) येथील सुकन्या व हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज वडूजची विद्यार्थिनी श्रद्धा प्रकाश काशीद हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा चाचणीसाठी निवड झाली आहे.
दि. 17 ते 19 सप्टेंबर 21 या कालावधीत उत्तर प्रदेश अमेठी इथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा चाचणीसाठी निवड झाली आहे. 72 किलो वजन गटात महिला कुस्तीगीर म्हणून विजयी ठरल्यामुळे सातारा तालीम संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष साहेबराव आबाजी जाधव शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी यांच्या हस्ते श्रद्धा काशीदला प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन सन्मान करण्यात आला.
प्राचार्या नयना दौड, प्रा. एस. बी. जाधव, उपमुख्याध्यापक महेश गोडसे, पर्यवेक्षक डी. जे. फडतरे यांनी श्रद्धा काशीदचे अभिनंदन केले.









