नवी दिल्ली
पोलाद बनवणारी कंपनी श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड आपला आयपीओ बाजारात आणण्याचा विचार करते आहे. याकरीता सेबीकडे कंपनीने अर्ज केला असून याअंतर्गत कंपनी 1 हजार 107 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनी 657 कोटी रुपयांचे ताजे समभाग बाजारात दाखल करणार आहे. तर दुसरीकडे प्रवर्तक व सध्याचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलमार्फत 450 कोटी रुपयांचे समभाग दाखल करणार आहेत. आयपीओ आणण्याआधी कंपनी इतर स्त्रोतामार्फत 250 कोटी रुपये उभारणार आहे.









