ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरच्या शोपियांमध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले असून, या भागात जवानांकडून शोधमोहिम राबवली जात आहे.
काश्मीर झोन पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शोपियांच्या झैनापोरा भागातील चेरमार्ग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने या भागात शोधमोहीम सुरू केली. हे पथक संशयास्पद जागेच्या दिशेने जात असताना तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गुप्तपणे सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला.









