बीजिंग : चीनची दिग्गज टेक कंपनी शोओमीने नवीन मीजिया इलेक्ट्रिक स्कूटर 1 एस या मॉडेलचे सादरीकरण केले आहे. सदर स्कूटरची किंमत 22 हजार रुपये असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. या स्कूटरची विक्री ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून चीनसह अन्य देशांमध्ये पाठविण्याची तयारी आहे. हे उत्पादन एमआय इकोसिस्टमच्या उत्पादनातील एक हिस्सा असल्याचेही स्पष्ट केले आहे.
स्कूटरचे वेगळेपण म्हणजे याला एकदा चार्ज केल्यानंतर ही तब्बल 30 किलोमीटर धावणार आहे तर एअरक्राफ्ट ग्रेड ऍल्युमिनीयमपासून गाडी तयार करण्यात आली आहे.









