उचगांव/वार्ताहर
वैद्यकीय सेवा ज्यावेळी उपलब्ध नव्हत्या त्यावेळी डॉ.मालतीताई यांनी गोरगरीबांना सुविधा दिल्या. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वळिवडे हायस्कूलला त्यांचे नाव दिले. दर्जेदार शैक्षणिक मूल्ये जपत दातृत्व आणि कर्तृत्वामुळेच डॉ. मालती दोशी हायस्कूलचा नावलौकिक सर्वदूर पसरला असल्याचे गौरवोद्गार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. वळीवडे (ता. करवीर) येथील डॉ. मालती दोशी हायस्कूलच्या इमारतीचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार ऋतुराज पाटील तर अध्यक्षस्थानी शांतिनाथ जीनगोंडा पाटील होते.
यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, विजय दोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हायस्कूलसाठी दिलेले योगदान व दातृत्व ज्ञानमंदिरे उभारण्यासाठी समाजाला प्रेरक असल्याचे आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर येथील शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी या ज्ञानमंदिरास एका उंचीवर नेऊन ठेवले याचा सार्थ अभिमान वळीवडेकरांना आहे. विद्यार्थींनी मोबाईलपासून दूर रहा विद्यार्थ्यांनी चांगले आचरण, चांगल्या गोष्टी आत्मसात करा व अभ्यासात लक्ष घालून मोबाईल पासून दूर रहा असा सल्ला देखील पाटील यांनी यावेळी दिला.
आमदार ऋतुराज पाटील यांनी डॉ.मालती दोशी हायस्कूल रौप्य महोत्सव साजरा करीत असुन शैक्षणिक गुणवत्ता उच्चत्तम ठेवली आहे. हायस्कूलला सर्व प्रकारची मदत करण्यास कटिबद्ध आहे असल्याचे सांगतिले. यावेळी इमारतीसाठी देणगी देणाऱ्या विजयकुमार मोहनलाल दोशी, चारुशीला दोशी, श्रीकांत दोशी, कुलभूषण चौगुले, अविनाश पाटील, सुकुमार वळिवडे यांचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर, डॉ. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या बांधकामाचा प्रारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्रा. जयंत आसगावकर, पंचायत समिती सदस्य प्रदीप झांबरे, वैशाली राजमाने, दिनकरराव कुसाळे,भगवान पळसे, रणजीतसिंह कुसाळे, सुहास तामगावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बालसाहित्य संमेलन, स्मरणीकेचे तसेच रांगोळी,कवी संमेलन आदी भरगच्च कार्यक्रम झाले.
शाळा समितीचे चेअरमन राजगोंडा वळीवडे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक मनोहर पवार यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. शाळा समितीचे दस्तगीर नदाफ, कृष्णात शेळके, चंद्रकांत पाटील यांनी संयोजन केले. यावेळी हायस्कूल व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. संजय खडके यांनी सूत्रसंचालन तर प्रदीप पाटील यांनी आभार मानले.