प्रतिनिधी / सरवडे
गुरुवारी रात्री आठ वाजता शेळेवाडी-चंद्रे (ता.राधानगरी )दरम्यान मेंगाणेवाडी येथे काही नागरिकांना प्रवासादरम्यान बिबट्यासद्रश प्राण्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या दोन्ही गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. शेळेवाडी गावचे पोलिस पाटील श्रीपती पाटील यांनी याची माहिती वनखात्यास दिली त्यामुळे वनखात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित प्राण्याच्या पायाच्या ठसाचे नमूने तपासले असता ते ठसे बिबट्याचे नसून तरस या प्राण्याचे असलेचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी वनक्षेत्रपाल एस.बी.बिराजदार,वनपाल सर्जेराव पाटील, वनरक्षक राजेंद्र बरगे, सखाराम गिरी यांनी भेट देऊन पहाणी केली व ग्रामस्थांना या प्राण्याविषयी घाबरण्याचे कारण नाही असाही खुलासा केला. यावेळी चंद्रेचे पोलिस पाटील प्रविण पाटील, उपसरपंच आप्पासो पाटील बापू कांबळे व दोन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








