प्रतिनिधी / पलूस
केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणाचा फटका सर्वसामान्य शेतकरी व सहकार क्षेत्राला बसत आहे. येथून पुढच्या काळात शेतीसोबत उद्योग वाढवून युवकांनी शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन वाढीवर भर दिला पाहिजे, आपण उभारलेला सहकार टिकवणे ही काळाजी गरज बनली आहे, असे प्रतिपादन पदवीधरचे आमदार अरूण लाड यांनी बांबवडे येथे केले.
बांबवडे येथे बांबवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बांबवडेचा शुभारंभ अरूण लाड यांच्या हस्ते झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमास जिल्हामध्यवर्ती बँकेचे संचालक किरण लाड, संस्थापक पोपटराव संकपाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ए.डी.पाटील, जय भवानी उद्योग समुहाचे प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मारुती चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना लाड म्हणाले, शेतीसोबत जोड व्यवसाय वाढवावा लागेल. शेतीवर अवलंबुन असणारे देश संपत चालले आहेत. त्यामध्ये कधीही भारताचा नंबर लागू शकतो. सहकारावर सुरू असलेले हल्ले थांबवणे हे तुमच आमच काम आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने कोणीही नाही. आपण उभा केलेले टिकवण्यासाठी युवकांना उच्च शिक्षण घेवून बाहेरील देशाचा अभ्यास करावा लागेल. पिढण्यान पिढया उत्पादन देणाऱ्या शेतीकडे लक्ष देवून चांगल्या पध्दतीने उत्पादन घेतले पाहिजे. नोकरीच्या मागे लागाच परंत शेतीला वाऱ्यावर सोडू नका.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ए. डी पाटील म्हणाले, कारखाने उभा करयाचे व आपणच मोडीत काढायचे अशी एक दृष्ट प्रवृत्ती वाढत असताना अरूण लाड यांनी क्रांती सहकारी साखर कारखाना आदर्शवत चालवला आहे. पलूस परिरसरात लाड व कदम हे दोन्ही कुटुंबे राजकारण, सहकार, समाजकारणात आदर्शवतपणे वाटचाल करीत समाजाशी बांधिलिकटी टिकवून आहेत. गावामध्ये खेडयामध्ये पतसंस्था चालवणे सोप काम नाही.
किरण लाड म्हणाले, सहकाराच्या माध्यामातून पश्चिम महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात सहकार उभा राहिला. सहकारी शेती, सहकारी पाणीपुरवठा योजना, सहकारी सोसाटया निर्माण झाल्या. मधल्या काळात सहकारी बँकातून सावकारीकी निर्माण झाल्यामुळे इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीकृत बँकात रूपातर केल्या शासनाच्या बँका पुन्हा खाजगीकरणात रूपातंतर होत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








