खोची/वार्ताहर
शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शेतकऱ्यांना सदैव सहकार्य करून जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध प्रकारचा कर्जपुरवठा तात्काळ करण्यास प्राधान्य द्या. कोणतेही कामे प्रलंबित ठेऊ नका. त्यांचे सर्व प्रश्न सोडवून सहकार्य करा. जिल्हा बँक ही शेती विकास साधण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करा असे आवाहन हातकणगंलेचे आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजूबाबा आवळे यांनी केले.
हातकणंगले तालुका गटविकास सचिव संघटनेचे सदस्य व बँक निरीक्षक यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार आवळे यांचा खोची विकास सेवा संस्थेचे सचिव नामदेव जाधव यांच्या हस्ते वाठार येथील महात्मा फुले सूतगिरणी कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँक निरीक्षक आर.के.कांबळे होते.
यावेळी बोलताना आमदार आवळे म्हणाले, हातकणंगले तालुक्यात विकास सेवा संस्थेच्या सचिव तसेच बँक निरीक्षक यांची अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासंदर्भात सातत्याने मागणी होत आहे. यामध्ये लक्ष घालून ती भरण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
यावेळी इंद्रजीत पाटील, सूरज नदाफ, राजकुमार चौगुले, सुभाष निंबाळकर, महादेव तेली, तानाजी वरुटे, शरद पाटील, भरत चौगुले, मोहन पाटील, प्रदिप गुरव, सिंकदर सुतार, अशोक शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी पावलस कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सचिन गोटखिंडे यांनी केले. आभार इंद्रजीत पाटील यांनी मानले.
Previous Articleकॉम्प्युटर बाबाविरोधात कारवाई
Next Article 93 वर्षांचे झाले लालकृष्ण अडवाणी









