प्रतिनिधी / शिरोळ
शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतुन वसंत राहू कांबळे वय वर्ष 62 राहणार रमाई माता नगर सांगली या शेतकऱ्यांने साडीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना आज रविवार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत वसंत कांबळे या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज काढले होते ते फेडायचे कसे या विवंचनेत होते. या निराशेतून रविवारी सकाळी नऊ वाजता धरणगुत्ती हद्दीतील गट नंबर 286 या शेतातील झाडास साडीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची वर्दी सर्जेराव राहू कांबळे रा. शिरोळ यांनी शिरोळ पोलिसात दिली असून शिरोळ पोलिस अधिक तपास करत आहेत.









