माडग्याळ/प्रतिनिधी
कुणीकोणूर ता. जत येथे गुरुवारी कर्नाटक राज्यातील अलीबादी जि.विजयपूर येथील मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी सांगोला भागात गेले होते परत गावाकडे येत असताना कुणीकोणूर येथे प्रकाश चव्हाण यांच्या शेतामध्ये मेंढ्या शिरल्या होत्या या कारणावरून प्रकाश चव्हाण याने मेंढ्या आमच्या शेतात का सोडल्या म्हणून राघू पांडू गोरड, जायाप्पा रामू गोरड व येराप्पा बाजू सुळ यांना काठी व दगडाने मारहाण केली होती व दोघांना गंभीर जखमी केले होते. त्यांना माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मिरजेला पाठवण्यात आले होते.
सदरच्या घटनेमुळे भयभीत झालेले भेढपाळ कुटुंब रात्रीच माडग्याळ सनमडी रोडलगत असणाऱ्या तीन डोंगरखजवळ येवून थांबले होते. तेथे रस्त्याच्या बाजूला ऐक शेततलाव आहे. त्या शेततलावातील पाणी आणण्यासाठी दोन महिला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या यामध्ये मनीषा तानाजी कोळेकर वय वर्षे 20 ही गरोदर महिला पायघसरुन पाण्यात पडली तीच्या बरोबर असणाऱ्या अन्य महिलेने तीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोल जावून तीही महिला पाण्यात पडली व जोरजोरात त्यांनी आरडाओरडा केला शेजारच्या शेतातकाम करणारे सुरेश तुकाराम माळी यांना हा आवाज येताच त्यांनी शेत तलावात उडी मारुन ऐका महिलेला कसेबसे बाहेर काढले मात्र दुसऱ्या महिलेला बाहेर काढण्यासाठी फार वेळ झाल्यामुळे ती महिला पाण्यात बुडन तीचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या पाडव्याच्या सणा दिवशी अशी दुख:द घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेमुळे मेंढपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची नोंद उमदी पोलिसात झाली आहे.









