पुणे \ ऑनलाईन टीम
केरळमधून वेगवान वाटचाल करत आज मान्सूनने राज्यात जोरदार धडक दिली आहे. हवामान विभागाने याबद्दलची माहिती जाहीर केली आहे. पुण्यातील अनेक भागात आज मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. तसेच मुंबईतही मान्सून पूर्व पावसाचे ढग तयार झाले असून अनेक भागांत रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
राज्याचे हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंबंधी माहिती देत म्हटले आहे की, मान्सून आज, ६ जून ला पुण्यात दाखल. राज्यात मान्सून अलीबाग- रायगड, पुणे व मराठवाडा मधील काही भागापर्यंत पोहोचला, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
मान्सूचा पुढील प्रवास आता संपूर्ण महाराष्ट्राभर सुरु झाला आहे. त्यामुळे काही तासांतच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही वेळातच राज्यातील अनेक भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची, शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेतीची कामे उरकून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. यंदा नेहमी पेक्षा लवकर राज्यात मान्यून दाखल झाला आहे,. त्य़ामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.








