प्रतिनिधी / सोलापूर
पोलीस प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांसाठी बंदुकीच्या गोळ्या झेलण्यासाठी तयार असल्याचे आव्हान जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केले. गोकूळ, लोकमंगल, भीमा, सिताराम शुगर या कारखाण्यावर त्वरीत आरआरसी कारवाई करावी व शेतकर्यांच्या खात्यात त्वरीत एफआरपी प्रमाणे ऊसबीले जमा करावीत व या मागणीसाठी जनहीत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्षप्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु होते. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असुन जिल्हाधिकारी यांनी चौदा तारखेला सर्व कारखानदारांची बैठक बोलावली असल्याचे आश्वासन दिल्याने तुर्तास आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे, अशी माहीती प्रभाकर देशमुखांनी दिली.
गोकूळ, लोकमंगल, भीमा, सिताराम शुगर या कारखाण्यावर त्वरीत आरआरसी कारवाई करा अन्यथा साखर संचालकाचे कपडे फाडून सोलापूर शहरातुन धिंड काढणार असल्याचा इशारा प्रभाकर देशमुखा यांनी दिला होता. कारण गोकूळ शुगर, लोकमंगल शुगर भडारकवठे, लोकमंगल बीबी दारफळ, भीमा शुगर सिताराम शुगर या कारखाण्यात 2019/20 या गळीत हंगामात गेलेल्या ऊसाची पुर्ण रक्कम साखर कायद्याप्रमाणे 14 दिवसाच्या आत जमा करायला पाहीजे होती परंतु ती जमा केली नसल्यामुळे संबंधित कारखाण्यांवर त्वरीत फसवणूकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती. कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या काळात शेतकरी अर्थिक आडचणीत सापडला आहे.
अशा वाईट व विचित्र परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचे काम संबंधित साखर कारखानदार करत आहेत. एफआरपीच्या साखर कायद्यानुसार 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिले जमा होणे अपेक्षित होते परंतु संबंधित साखर कारखानदारांनी साखर कायदा पायदळी तुडवून ऊस उत्पादकांची घोर फसवणूक केली आहे. संबंधित कारखान्यावर आर आर सी कारवाई करून शेतकऱ्यांची एफ आर पी ची रक्कम त्वरित जमा करावी अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचेही देशमुखांनी सांगितले.
यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष विकास जाधव जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नलवडे चंद्रकांत निकम रघु चव्हाण अण्णासाहेब वाघचौरे महेश पठारे पप्पू दत्तु सुनिल पुजारी नरेश मोरे शशी थोरात सचिन अटकळे बिरुदेव ढेकळे नागनाथ पवार चांगदेव चव्हान भाऊसो बोडके कीशोर बनकर राहूल देशमुख व मोठ्या संख्येने ऊसउत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.
Previous Articleसोलापूर जिल्ह्यात उत्पादित ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठीच
Next Article भार्गवी चिरमुले दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत









