वार्ताहर / पुलाची शिरोली
शेतकऱ्यांच्या अडीअडचणी तात्काळ सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु असे आश्वासन महा. वितरणचे शहर कार्यकारी अभियंता श्री.एन.आर. गांधेल यांनी दिले. पुलाची शिरोली येथे आयोजित शेतकरी व शिरोली विकास संस्थेचे संचालक यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. या विशेष बैठकीसाठी माजी आमदार महाडिक यांनी प्रयत्न केले.
चार दिवसांपुर्वी अमल महाडिक यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या कृषी औजारे बँकेचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडुन होणाऱ्या अडीअडचणी व समस्या बाबत तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन महाडिक यांनी ही बैठक घडवुन आणली.
यावेळी गांधेल यांनी शेतकऱ्यांनी ८ तासांच्या ऐवजी १२ तास सुरू करण्याची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच वीज वितरण बाबतच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आपण तात्काळ प्रयत्न करू असे सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव







