प्रतिनिधी / बार्शी
मागील ३ – ४ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून त्याची पाहणी करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड आज बार्शी तालुक्यातील खामगाव येथे आले होते.त्यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की,मागील पंधरवाड्यात झालेल्या पावसामध्ये मुग,उडदाचे तर तीन दिवसाखालील पावसाने कांदा, सोयाबीन, कापसासह सर्वच शेतकऱ्यांचे ८० ते १०० % नुकसान झालेले असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने पंचनामे न करता सरसकट जिरायत एकरी ५० हजार तर बागायतास १लाख रूपये लवकरात लवकर खातेवर जमा करावे,
अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलने केली जातील व मंत्र्यांनाही घराबाहेर पडणे मुस्किल केले जाईल असा खणखणीत इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला, त्यावेळी शेतकरी संघटनेचे शरद भालेकर, सागर डोके, गुलाब लोखंडे, रामहरी लोखंडे, गणपत लोखंडे, हनुमंत लोखंडे, सौदागर लोखंडे, उमेश लोखंडे, हरी लोखंडे, भिमराव नलगे, नागनाथ लोखंडे, बाबासाहेब लोखंडे, सचिन लोखंडे, सतीश लोखंडे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









