प्रतिनिधी / अक्कलकोट
केंद्रातील मोदी सरकारने सत्तेचा दुरूपयोग करत सातत्याने शेतकऱ्यांवर जुलूम चालवले आहेत. महागाई व जनविरोधी कायद्यांमूळे जनता मेटाकूटीला आली आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेत भाजपच्या मंत्र्यांचा मुलगा ज्या पध्दतीने शेतकऱ्यांना चिरडून ठार करतो ही बाब भविष्यासाठी घातक ठरणार असून वेळीच या सरकारला जाग यावी यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अक्कलकोट तालूक्यातील जनतेने प्रतिसाद देण्याचे आवाहन माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले.
महाविकास आघाडीने उद्या, सोमवारी (दि.११) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. यास अनूसरून अक्कलकोट येथे शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय काँग्रेस व इतर मित्रपक्षांच्या नियोजित बैठकीत म्हेत्रे बोलत होते.
यावेळी सभापती प्रथमेश म्हेत्रे, पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे, उपसभापती प्रकाश हिप्परगी, शिवसेनेचे संजय देशमुख, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, नगरसेवक सद्दाम शेरीकर आदी उपस्थित होते. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी बंदला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी अक्कलकोट शहरातील व्यापारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









