आमदार प्रवीण झांटय़े यांचे आवाहन : खाणवाल्यांनी शेतकऱयांना सांभाळून व्यवसाय करावा, पैरा मये येथे खाणीवर संयुक्त पाहणी
डिचोली/प्रतिनिधी
मयेतील शेतीची झालेली हानी तसेच नैसर्गिक जलस्रोतांची झालेली हानी यामुळे आज आमदार प्रवीण झांंìîाे यांनी सरकारी अधिकारी व खाण खात्याच्या अधिकाऱयांना तातडीने लक्ष घालून शेतकऱयांच्या शेतीची सुरक्षा तसेच नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश दिले.
मयेतील चौगुले कंपनीच्या व सेसा कंपनीच्या उत्खननामुळे गेली 30 वर्षे शेतीची मोठी हानी झाली तसेच मातीचा भराव शेतात जाऊन नुकसानी तसेच नैसर्गिक जल स्रोत उद्ववस्त झाल्याने शेतकऱयांनी खनिज मालाची वाहतूक रोखली होती. त्यानंतर याप्रश्नी संयुक्त पाहणी करण्याचे ठरले होते।
त्यानुसार आज आमदार प्रवीण झांटय़े , मामलेदार प्रावीणजय पंडित, सरपंच तुळशीदास चोडणकर, खाण कृषी विभाग भू विभाग आदि अधिकारी तसेच शेतकरी सखाराम पेडणेकर व इतर शेतकरी तसेच दया कारबोटकर व पंचमंडळी उपस्थित होती.
सखाराम पेडणेकर यांनी शेतकरी वर्गाला कशाप्राकारे गृहीत धरून सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करते व खाणवाल्याना समर्थन देते याबाबत सविस्तर भूमिका मांडली. शेतीची मोठी हानी झाली असून साडेतीनशे शेतकरी झळ सोसत आहेत. या ठिकाणी मातीचा भराव शेतात जाऊन पावसात मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. तसेच शेतकऱयांना शेतीचे पुनरुज्जीवन होईपर्यंत आर्थिक मदत द्यावी, अशी भूमिका संयुक्त पाहणी दरम्यान मांडली.
तसेच गोयांगणे तलाव, तीर्थ बाग व इतर नैसर्गिक जलसाठे उध्वस्त झालेत. त्याला खाणवाले जाबाबदार असल्याचे सांगितले. चौगुले कंंपनीने नुकसान भरपाई द्यावेे तसेच बेकायदा उत्खनन चालू असून कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी आमदार झांटय़े यांनी शेतकरी वर्गाची व्यथा समजून घेताना खाण कृषी विभागाच्या अधिकाऱयांनी त्वरित सर्वे करून अहवाल सादर करावा. तसेच शेतकऱयांच्या प्रश्नांना तातडीने प्राधान्य द्यावे. अशी मागणी करून तसे आदेशही दिले.
मये हा कृषीप्रधान प्रदेश असून आज प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. गेली तीस वर्षे येथील जलस्रोत उध्वस्त झालेले आहेत ते तातडीने पूर्ववत होणे गरजेचे असून त्यासाठी सर्व खात्याने तातडीने कार्यवाही करावी शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीही सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे झांंìîाे यांंनी या वेळी सांगितले.
खाण कंपन्यांनी आपली भूमिका मांडली तसेच कृषी व खाण विभागाच्या अधिकाऱयांनी संपूर्ण पाहणी करून आपला अहवाल सात दिवसात सादर करणार असल्याचे सांगितले.
शेतकरी सध्या विवंचनेत असून त्यांना नुकसान भरपाई तसेच पावसाळय़ात शेतात खनिज मातीचा भराव जाऊन होणाऱया नुकसानीची चिंता असून त्यावर तातडीने उपाय करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी सरपंच चोडणकर यांनी शेतकऱयांचे प्रश्न तातडीने निकालात काढण्यात यावेत अशी मागणी केली.









