ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबचे डीआईजी (जेल) लखविंदरसिंह जाखड यांनी आपला राजीनामा पंजाब सरकारकडे पाठविला आहे.
शेतकरी आंदोलनाला पंजाबचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.
राजकारणापासून क्रीडाविश्वापर्यंतचे लोक शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवत आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी पद्मविभूषण आणि राज्यसभेचे खासदार सुखदेवसिंह धिंडसा यांनी नुकतीच पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
माजी हॉकी कर्णधार परगट सिंगसह पंजाबमधील 27 खेळाडूंनी तसेच पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, पंजाबमधील प्रसिद्ध कवी डॉ. मोहनजित, प्रसिद्ध विचारवंत डॉ. जसविंदर सिंग आणि पंजाबी नाटककार व एका वृत्तपत्राचे संपादक यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.









