प्रतिनिधी / कुपवाड
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात लादलेले अन्यायकारक कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला तसेच दिल्लीतील आंदोलनास कुपवाडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंगळवारी सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कुपवाड शहरासह विस्तारीत भागातील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. शहरातील विविध संघटनांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. कुपवाड पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे शहरात दिवसभर कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत गेल्या आठवडयांपासून शेतकऱ्यांनी
आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतककरी संघटनेने मंगळवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून कुपवाड परिसर, सावळी, कानडवाडी, तानंग, मानमोडी व बामणोली आदी गावच्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवून पाठिंबा दिला.








