कोरोना काळात बळीराजा संकटात : सरकारने लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
मागील वषी कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले होते. यावर्षीही खरीप पेरणीच्यावेळीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. एक तर खतांचे दर गगनाला भिडले आहेत. यातच पेट्रोल डिझेल दर वाढल्यामुळे बी-बियाणेही महाग झाली आहेत. मागील वषी कर्जमाफी झाली. मात्र काही शेतकऱयांनाच त्याचा लाभ झाला तर काही शेतकऱयांना कर्जमाफी झालीच नाही. त्यामुळे शेतकरी यावर्षीही कर्जमाफी करावी, अशी मागणी करू लागले आहेत.
कोरोना काळात बळीराजा शेतात काम करत आहे. मात्र काम करत असताना अनेक अडचण्यांना तोंड द्यावे लागत आहे. भाजीपाला खरेदीसाठी कोणीच नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. फूल उत्पादक शेतकऱयांना तसेच इतर काही शेतकऱयांना पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र भाजीपाला तसेच इतर पिके घेणाऱया शेतकऱयांना पॅकेज जाहीर केले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तेव्हा तातडीने कर्जमाफीच करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मागील वषी कर्जमाफी झाली. मात्र त्यानंतर अनेक शेतकऱयांना कर्जच वाटप करण्यात आले नाही. त्याचा फटका शेतकऱयांना सहन करावा लागला होता. आता पुन्हा खरीप पेरणीसाठी कर्जाची गरज आहे. तेव्हा शेतकऱयांसाठी विशेष कर्ज योजना जाहीर करावी, अशी मागणीही होत आहे. एकूणच कोरोना काळात आणि महामागाईमुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. याचा कोठे तरी विचार होणे गरजेचे असून सरकारने यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे मोठय़ा शेतकऱयांना लाभ होत असला तरी लहान शेतकऱयांना कोणत्याच योजनेचा लाभ होताना दिसत नाही. लहान शेतकरी हा विविध अडचणींमध्ये अडकलेला असतो. त्याला या योजनांची माहिती देखील नसते. तसेच कर्ज घेतानाही मोठय़ा शेतकऱयांनाच अधिक कर्ज दिले जाते. जमिनीच्या आकारानुसार पीक कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज दिले जात आहे. मात्र लहान शेतकऱयांसाठीच अधिक कर्जाची तरतूद करणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.









