प्रतिनिधी / बेळगाव
मजगाव येथील शेतकऱयांना माती परीक्षण करून प्रत्येक शेतकऱयांना कार्डचे वितरण केले. दि. 12 रोजी मजगाव येथील श्री ब्रह्मलिंग मंगल कार्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकारी वज्रेश्वरी कुलकर्णी होत्या.
व्यासपीठावर कृषी खात्याचे निजलिंगप्पा, साखर संस्थेचे वैज्ञानिक एस. एन. एक्केली व तांत्रिक व्यवस्थापक राजशेखर भट्ट, नेमिनाथ चौगुले, पांडू पट्टण, माणिक पाटील उपस्थित होते.
सहा महिन्यापूर्वी मजगाव परिसरातील शेतवडीतील ठिकठिकाणची माती नेऊन बेंगळूर येथे परीक्षणासाठी पाठवून त्याचे परीक्षण करवून त्या परिसरातील जमिनीमध्ये कोणकोणते घटक आहेत. त्यामध्ये आवश्यक असणारे घटक याबद्दल सविस्तर माहिती त्या कार्डमध्ये असल्याचे सांगितले. कार्डात नमूद केल्याप्रमाणे शेतकऱयांनी त्या घटकांचा वापर करावा, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी उपस्थित कृषी अधिकाऱयांनी पिकांच्या वर्गवारीप्रमाणे आवश्यक असणारे घटक, त्यांना द्यावयाचे पोषक घटक याबद्दल माहिती दिली. गांडूळ खत निर्मिती बद्दलही मार्गदर्शन केले. जास्तीतजास्त गांडूळ खतांचा मारा कमी करावा. रासायनिक खतामुळे रोगराईचे प्रमाण वाढल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. व वेळोवेळी कृषी खात्याकडून मिळणाऱया सुविधांचा लाभ घ्यावा व संपर्कात राहणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थितांच्या हस्ते माती परीक्षण केलेले कार्ड शेतकऱयांना सुपूर्द केले. यावेळी 75 हून अधिक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मजगाव येथील श्री ब्रह्मदेव कृषी संघटनेतर्फे केले होते. यावेळी नेमू पाटील व देवेंद्र बस्तवाडकर यांनी परिश्रम घेतले.









