ऑनलाईन टीम / परभणी :
मुंबईतील श्रीमंतांच्या नाईट लाईफची चिंता करणाऱया राज्य सरकारने शेतकऱयांच्या नाईट लाईफचा विचार करावा, असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीत लगावला.
संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजीत कृषी संजीवनी राज्यस्तरीय महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मराठवाडय़ातील शेतकऱयांना सर्वाधिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी कर्जात बुडाला आहे. आज मराठवाडय़ातील शेतकऱयांना रात्री-अपरात्री पिकांना पाणी द्यावे लागते. याचा विचार सरकारने केला पाहीजे. पण सरकार मात्र मुंबईच्या नाईट लाईफचा विचार करण्यात मग्न आहे. खरं तर सरकारने शेतकऱयांच्याही नाईट लाईफची चिंता केली पाहीजे.