महामार्ग रुंदीकरण जमीन संपादन प्रकरणी निवेदन : जिल्हाधिकाऱयांना अहवाल सादर करण्याची सूचना
वार्ताहर /कोगनोळी
कोगनोळी (ता. निपाणी) येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रुंदीकरणासह सहापदरी रस्ता होणार आहे. येथे मोठे उड्डाणपूलही तयार करण्यात येणार आहे. येथील अनेक शेतकऱयांची सुपीक जमिनीचा भुखंड संपादन करण्याचा प्राधिकरणाने घाट घातला आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार आहे. हा उड्डाणपूल येथे न करता इतरत्र गायरान जागेत उभारण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी व व्यापारी यांनी रयत संघटना चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना दिले.
मुख्यमंत्री बोम्माई हे बेळगाव जिह्याच्या दौऱयावर आले असता कोगनोळी येथील शेतकरी व व्यापाऱयांनी त्यांची भेट घेऊन उड्डाणपूलामुळे येथील अनेक शेतकऱयांची सुपीक जमीन जाणार असल्याने मोठे नुकसान होणार आहे?. तसेच अनेक व्यवसाय बंद होऊन अनेक नागरिकांच्या उपजिविकेचे साधन बंद होऊन नुकसान होणार आहे असे मुख्यमंत्र्यांना सांगून सदर उड्डाणपूलाचा प्रकल्प कोगनोळी सोडून इतरत्र गायरान जागेवर करावा, अशी विनंती केली.
यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांना कोगनोळी येथील प्रकल्पाचा पाठपुरावा करुन अहवाल सादर करावा, असा आदेश दिला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱयांच्या सोबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्यासह कर्नाटक रयत संघटना अध्यक्ष चिन्नाप्पा पुजारी, बेळगाव जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नाईक, गौरव अध्यक्ष शशिकांत पडसलगी, निपाणी ग्रामीण युवा रयत संघटना अध्यक्ष बाळासाहेब हादीकर, आय.एन.बेग, कलगोंडा कोटगे, प्रविण शितोळे, अरुण पाटील, संदीप चौगले, अनंत पाटील, विठ्ठल माने, उमेश परीट, नारायण पाटील, सुनिल माने, वासिम शिरगुप्प?, युवराज माने, पुंडलिक माळी, मधुकर इंगवले, मन्स?र शेंडूरे, तानाजी जाधव, नागेश पाटील, मुनीर मुल्ला, राजू पाटील, विनायक चौगुले, प्रकाश वडर, संतोष चौगुले, विजय सावजी, अजित चौगुले, तौसिफ मुल्ला, संतोष सोलापूरे, सागर नवाळे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.









