ऑनलाईन टीम / मुंबई :
येत्या मार्च महिन्यांपासून राज्यातील शेतकऱयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दोन लाखांपर्यंत ज्यांचे पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार आहे. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज आणि नियमित कर्ज फेड करणाऱयांसाठी लवकरच नवी योजना आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱया भागात ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱयांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवून उत्पादन वाढीवर भर द्यायचा आहे. त्यासाठी योग्य त्या योजना राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच शेतमालाला हमीभाव कसा मिळवून देता येईल, शेतमालाचे मार्कैटिंग कसे करता येईल, यासाठी एखादी चेन उभारता येईल का, याची आणखी करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.









