प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकरी संघाच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा उपनिबंधक अमोल शिंदे यांनी बुधवारी संघाच्या भवानीमंडी बेती कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला तत्पुर्वी त्यांनी संघाचे संस्थापक सहकारमहर्षी संघाला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणू असा तात्यासाहेब मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान त्यांनी सर्व खाते प्रमुख यांची ओळख परेड घेतली यामुळे संघाच्या हितासाठीच काम करा अशा सूचना दिल्या सकाळी नऊ ते साडे अकरा पर्यंत रोज शेतकी संघाच्या कामकाजात लक्ष घालणार असून पेट्रोल शाखांचा दैनंदिन आढावा घेतला असेल तसेच मालमत्तांची तपासणी करून अंतर्गत लेखापरीक्षण करणार असल्याचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुख्य व्यवस्थापक सरनोबत कामगार प्रतिनिधी दीपक निंबाळकर आदी उपस्थित होते.









