प्रतिनिधी / कोल्हापूर
कृषी विधेयकावरून मंगळवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेला भारत बंद फेल गेला आहे. पंजाब, हरियाणात त्याला प्रतिसाद मिळाला, पण पश्चिम भारतात या बंदला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात महाविकास आघाडीने पाठींबा देऊनही फारसा प्रभाव दिसला नाही, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट पेले. याचवेळी काँग्रेस आघाडीने राजकारण करून शेतकऱयांना अकारण भडकवू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कोल्हापूरला भेट दिले. यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रिपाइं आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रूपाताई वायदंडे, संपर्कप्रमुख मधुकर कांबळे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, शेतकऱयांच्या पांठिंब्यावरच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी विविध योंजना आणल्या. शेतकऱयांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवल्या. केंद्राने 3 कृषी विधेयके मंजूर केली आहेत. यावर संसदेत काँगेसने विरोध केला नाही. आता यावरून काँग्रेस राजकारण करत आहे. शेतकऱयांना भडकावत आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या 2019 च्या निवडणूक घोषणापत्रात असा कायदा करू, अशी काँग्रेसने ग्वाही दिली होती, आता तेच याला विरोध करत आहेत. काँग्रेसला यावर राज्यसभेत चर्चा करण्याची संधी होती, पण तेथेही त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप त्यांनी केला.
पंजाब, हरियाणातील शेतकऱयांचा या विधेयकांना विरोध आहे. त्यांची हे कायदे रद्द करण्याची मागणी आहे. केंद्र सरकारने दुरूस्तीची भुमिका घेतली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. येत्या दोन दिवसांत यातून निश्चितच मार्ग निघेल, असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला. डावी आघाडी, शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंद पुकारला, पण त्याला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात 100 टक्के प्रतिसाद मिळाला दक्षिण, पश्चिम भारतात याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात महाविकास आघाडीने पाठींबा देऊनही भारत बंद अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









