बेडकीहाळ येथील युवा शेतकरी कर्जबाजारीच्या मानसिक तणावाखाली येऊन स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार ता. 2 रोजी सकाळी 10 च्या दरम्यान उघडकीस आली आहे. गणेश मल्लकिार्जुन चौगुले वय वर्षे 38 असे त्या दुर्दैवी युवा शेतकर्याचे नाव आहे. घटनास्तळावरून मिळाली अधिक माहिती अशी गणेश चौगुले हा आपला शेती व्यवसाय करत आपल्या आई – वडिलांबरोबर जीवन जगत होता. त्याचे वडील यांनी शेती करण्यासाठी व इतर घर खर्चासाठी काही बँकेतून व हात उसने करून कर्जबाजारी झाले होते. वडिलांच्या कर्जाच्या ओझ्याखाली गणेश दिवसेंदिवस चिंतेत होता वडिलांना वारंवार बाबा आपले कर्ज कसे फेडायचे विचारत होता. यामुळे तो पूर्णपणे मानसिक तनावाखाली येऊन त्याने आपल्या राहत्या घरातील माळीवरती साडीच्या साहा³याने गळफास लावून आपले जीवन संपविले. गणेश हा रोजच्या प्रमाणे रात्री जेवण करून झोपण्यासाठी वरती गेला होता. सकाळी तो लवकर उठला नाहि म्हणून आई पाहण्यासाठी गेल्यास तो गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









