प्रतिनिधी / कणकवली:
अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र शाखेतर्फे 21 डिसेंबर रोजी दिल्लीतील शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला महाराष्ट्रातून मोर्चा नेण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्गातील शेतकऱयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेतर्फे करण्यात आले आहे.
देशात चाललेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलची ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली. यात कोकणसह महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सभेमध्ये दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकऱयांचा वाहन मोर्चा थेट दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांतून शेतकऱयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.









