प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने गुरुवार 5 रोजी भव्य ट्रक्टर रॅली काढण्यात येणार आहे. निर्माण चौक ते दसरा चौक या मार्गावर ही रॅली निघणार आहे. रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती पालकमंत्री तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पाटील म्हणाले, सकाळी नऊ वाजता निर्माण चौक, संभाजी नगर, येथून रॅलीला सुरुवात होणार असूनदसरा चौक येथे सांगता होणार आहे. या रॅलीमध्ये काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, तालुकाध्यक्ष व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या रॅलीमध्ये जिल्हÎातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी ट्रक्टरसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले आहे.
कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयकं मंजूर करुन घेतली. लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.
महाराष्ट्रातही या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. 15 ऑक्टोबर रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य `शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या व्हर्चुअल रॅलीच्या माध्य्मातून राज्यातील 10 हजार गावातील सुमारे 50 लाख शेतकऱयांशी काँग्रेस नेत्यांनी संवाद साधला होता. अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.
केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी कायदा आणून मोदी सरकार आपल्या अन्नदात्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला महापौर निलोफर आजरेकर जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, गुलाबराव घोरपडे, उपमहापौर संजय मोहिते, सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, चंदा बेलेकर, संपत चव्हाण पाटील, विक्रम जरग आदी उपस्थित होते
Previous Articleसोलापुरात खुनी हल्ला प्रकरणी अकराजणांवर गुन्हा दाखल
Next Article आयसोलेशन हॉस्पिटलमधील लॅबटेक्निशियनला मुदतवाढ द्या









