प्रतिनिधी / चंदगड
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी चंदगड तालुक्यातील तुर्केवाडीत बुधवारी भरणारा आठवडी बाजार भरणार नाही. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसठी ८ रोजी तुर्केवाडीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतील, असे सरपंच रुद्राप्पा तेली यांनी सांगितले आहे.
चंदगड तालुक्यातील तुर्केवाडीत पंचक्रोशीतील मोठा बाजार भरतो. या ठिकाणी जनावरांचीही खरेदी-विक्री होते. बेळगाव परिसरातील नागरिकही या बाजाराला येत असतात. यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीतील अटी चुकीच्या असून सरसकट कर्जमाफी करावी, अशी तुर्केवाडी ग्रामस्थांची मागणी आहे.